Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या शिक्षक कॉलनी येथे एस टी चालकाच्या घरावर दरोडा  तलवारीचा धाक दाखवून ९३...

शिक्षक कॉलनी येथे एस टी चालकाच्या घरावर दरोडा  तलवारीचा धाक दाखवून ९३ हजारांचा ऐवज लंपास 

0
315
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – 
शहरातील बीड रोडवर जवळील शिक्षक कॉलनी या ठिकाणी अज्ञात चोरटय़ांनी एस टी चालकाच्या घरावर तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकला. या दरोड्यात दरोडेखोरांनी ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फीर्यादी विजय नवनाथ खुपसे (एस टी ड्रायव्हर) रा. शिक्षक कॉलनी जामखेड हे रात्री घरात झोपलेले असताना दि २७ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात पाच दरोडेखोरांनी त्यांच्या कीचन चा दरवाजा तोडला व घरात प्रवेश केला. यानंतर फीर्यादीस तलवारीचा धाक दाखवून घरातील बेडरुम मध्ये जाऊन कपाट तोडुन कपाटातील ९३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. घटनास्थळी अहमदनगर येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. फीर्यादी एस टी चालक विजय खुपसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात पाच दरोडेखोरांनविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!