नगर-बीड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे सोमवार पासून बुजविणार – सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या पाठपुराव्याला यश

0
301
जामखेड  प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
नगर बीड या जामखेड शहरातून जाणा-या राष्र्टीय महामार्गावरील खड्डे सोमवारपासून (दि.२७) बुजविण्यात येतील.असे आश्वासन राष्टीय महामार्ग नगर उपविभागाचे उपअभियंता दिलीप तारडे यांनी दिली याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वारंवार याबाबत पाठपुरावा केला होता याला अखेर यश आले आहे.
 नगर बीड हा राष्टीय महामार्ग जामखेड शहरांतर्गत अत्यंत खराब झाला असून, या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते  कोठारी यांनी उपअभियंता तारडे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तारडे यांनी तातडीने दखल घेत, सोमवारपासूनच खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ करत असल्याचे कोठारी यांना सांगितले.
 सामाजिक कार्यकर्ते कोठारी हे याकामी वेळोवेळी पाठपुरावा करून सबंधीत अधिका-यांच्या निदर्शनास ही बाब आणून , काम करून घेत असतात. यापुर्वी डिसेंबर २०२० मध्ये अशीच तक्रार कोठारी यांनी करून खड्डे बुजवून घेतले होते.
चौकट –
अहमदनगर ते जामखेड ते मोहा जिल्हा हद्दीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ हा रस्ता  उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, उपविभाग नगर अंतर्गत आहे.नगर जिल्हा हद्द ते बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी हा रस्ता उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बीड यांच्या अंतर्गत येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here