Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या पन्नास लाखांचा गांजा पोलीसांनी केला जप्त

पन्नास लाखांचा गांजा पोलीसांनी केला जप्त

0
312
जामखेड न्युज – – – – 
पुणे पोलिसांनी गांजा तस्करी पकडली. पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस गावाजवळ गांजाची तस्करी करणारी एक टोळीच यवत पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीकडून पोलिसांनी ५० लाखांचा गांजा जप्त केला आहे. दौंड तालुक्याच्या पाटस गावात रविवारी मध्यरात्री पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांची मोठी कारवाई
सोलापूर महामार्गावरुन जाणाऱ्या एका ट्रकमध्ये गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याला मिळाली होती. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एक मालवाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली. यावेळी पोलिसांना ट्रकमध्ये ५० लाख किमतीचा गांजा सापडला.
पुणे व मुंबईत विक्री
यावेळी पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या १० जणांच्या टोळीला अटक केली. यवत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गांजा परराज्यातून विक्रीसाठी पुणे जिल्ह्यातील काही दुकानांत आणि मुंबईत विक्रीसाठी आणला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!