जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि अहमदनगर जिल्हा आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून पद्मविभूषण मा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मोफत आरोग्य शिबिरांतर्गत मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 22 व 23 डिसेंबर रोजी कर्जतमधील चापडगाव, बारडगाव, कुळधरण, मिरजगाव, राशीन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच जामखेडमधील अरणगाव, नान्नज, खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे.
डोळे हा मानवी शरीराचा अत्यंत नाजूक अवयव आहे. तसेच त्याची योग्य वेळी निगा राखणे व काळजी घेणे आवश्यक आहे. हेच लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी 9696330330 या क्रमांकावर नागरिक संपर्क करू शकतात.
दरम्यान, 22 व 23 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटपाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.