चित्रपटातील आयटम साँगप्रमाणे किरीट सोमय्या कामगिरी बजावत आहेत – आमदार रोहित पवार 

0
363
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
पवारांवर आरोप करून अनेक जण मोठे झाले आहेत अशी कबुली अनेक नेत्यांनी दिली आहे. आता सोमय्या तसेच आरोप करत आहेत. जसे एखादा सिनेमा हिट होवो अगर प्लॉप जावो त्यामध्ये अँटमसॉंग असते. त्याप्रमाणे सध्या सोमय्या अँटमसॉंगची कामगिरी बजावत आहेत असा टोला आमदार  रोहीत पवार यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्रकार परिषदेत लगावला.
 भाजपच्या सभेत केलेल्या आरोपाबाबत आ. रोहीत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भाजप उमेदवारांनी माघारी का घेतली याबाबत न्यायालयात सांगितले आहे. आपले उमेदवार माघार का घेतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. निवडणुकीतील पराभव समोर दिसताच ते आता दबावतंत्र व दहशतीचे आरोप करत आहेत असं रोहित पवार यांनी बोलून दाखवलं.
नगरपरिषदेच्या हद्दीतील 1600 च्या आसपास घरकुलधारकांचे सिटी सर्व्हेमध्ये नाव नाहीत. सदर घरकुल धारकांनाच तेथे स्वत:च्या नावाचे घरकुल देणार आहे. त्यांना बेघर करणार नाही, तसेच रस्त्यावर असलेल्या एकही टपरीधारक उठणार नाही, याची आपण सातत्याने ग्वाही देऊनही विरोधक मते मिळवण्यासाठी माझा विरोध करत असल्याचा अपप्रचार करत आहेत.
कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री संत गोदड महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपच्या सभेत करताना किरीट सोमय्या यांना दोन पावले चालणे झाले नाही. संयोजकांनी खुर्चीसहीत गोदड महाराज यांची प्रतिमा सोमय्यांसमोर आणली व प्रतिमा पुजन करून तसेच आडबाजूला ठेवली. यामुळे गोदड महाराजांसह आम्हा सर्व नागरिकांचा अवमान झाला आहे. किरीट सोमय्या देवापेक्षा मोठे झाले आहे का असा सवाल देखील आ. रोहीत पवार यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here