जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
गेली १६ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुर्यकांत मोरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने साजरा करण्यात येणारा दत्त जयंती उत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. चंद्रकांत मोरे व डॉ. सौ. भारती मोरे या दाम्पत्याने दत्तांची आरती करत साध्य पध्दतीनेच आपला लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
शनिवार दि. १६ डिसेंबर रोजी सुर्यकांत मोरे यांच्या शेतमळ्यात असलेल्या दत्त मंदीरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान महाभिषेक, पुष्पवृष्टी व प्रांगणात झालेल्या हभप कैलास महाराज भोरे यांच्या प्रवचनाने व महाप्रसाद वाटपाने या जयंती सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, पंचायत समिती सभापती राजश्री मोरे, सुर्यकांत मोरे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, साहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार, अशोक शेळके, भाऊसाहेब माने, युवराज ढेरे, डॉ. युवराज खराडे, डॉ. कुंडलिक अवसरे, डॉ. सुनील हजारे, डॉ. सचिन काकडे, रमेश आजबे, राहुल उगले, प्रवीण उगले, शरद शिंदे, मनोज कुलकर्णी, अनिल यादव आदी मान्यवरांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



