आमदार रोहित पवार प्रचाराला आले आणी कुंभार बांधवाचे बोळके बनवत बसले!!

0
275
जामखेड न्युज – – –
  आमदार रोहित पवार कर्जतमध्ये प्रचारानिमित्त कुंभार गल्लीत गेलो असता काही बांधव संक्रांतीसाठी बोळके बनवत होते. आमदारांनीही त्या फिरत्या चाकावर चिखलाला आकार देऊन बोळके निर्मितीचा विलक्षण अनुभव घेतला. कर्जतमधील याच मंडळींच्या पाठिंब्यावर शहरालाही त्या सुंदर बोळक्याप्रमाणे आकार देण्याचा माझा प्रयत्न आहे”., असे आमदार रोहित पवारांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी हा  समाज प्रवाहाचे नेतृत्व करत असतो त्यांचा तो प्रतिनिधी असतो. समाजात विविध घटक आपल्या परीने उदरनिर्वाह करत असतात. यात पारंपरिक व्यवसाय याला धर्म,परंपरेची जोड आहे. आणि हे उद्योग-व्यवसाय सुरू असतात. आता कारण काहीही असो, ज्यावेळी ज्या-त्या वेळी संबंधित समाजाला भेटण्याचा योग आल्यावर त्या समाजाशी एकरूप होणे, त्यांचे प्रश्न समजावून घेणे हे समाज अथवा लोक प्रतिनिधीचे  कर्तव्य मानलं जातं.
(काय असतं हे, कसं करतात..)
असंच काहीसं करण्याचा प्रयत्न कर्जत-जामखेड चे विधानसभा लोकप्रतिनिधी रोहित पवार करताना अनेकदा दिसून येतात. सध्या कर्जत नगर पांचायतींचे इलेक्शन सुरू आहे, आता इलेक्शन म्हंटले की प्रचार सभा, प्रचार रॅलीज आल्याच. अशाच एका प्रचार रॅलीत आ.रोहित हे कर्जत मधील कुंभार आळीत आले. तिथे त्यांनी राजकारणी म्हणून प्रचारही केला.
(करून पाहू यात..!!,.जमत का??)
मात्र कुंभार बांधव आपल्या कामात गढून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. नव्या वर्षात असणाऱ्या संक्रांतीच्या सणासाठी ही मंडळी सध्या मातीची बोळके बनवत आहेत. आणि मग हरहुन्नरी आमदार साहेबांनी पण बैठक मारली आणि हातात मातीचा गोळा घेत त्याला आकार देण्याचा प्रयत्न केला.. अर्थात पहिल्या प्रयत्नात सर्व काही व्यवस्थित जमत नसले तरी ते कसे जमवून घ्यायचे याचे कसब ‘पवार’ कुटुंबातील रोहित यांना नसणार असे होणार आहे का!!
(अहो, जमलं की हो!!)
अर्थात आमदार रोहित यांनी लीलया मातीचे बोळके बनवले. अर्थात या बद्दल त्यांनाही त्याचे समाधान वाटले आणि इतरांनीही कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here