जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालयात इतिहास विभागात कार्यरत असलेल्या प्रा अश्विनी गायकवाड यांनी “प्राचीन भारतातील संस्कृती ,सभ्यता आणि सामाजिक गतिशीलता यांचा अभ्यास ” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केल्याने राजस्थान च्या ओ पी जे एस या विद्यापीठाने त्यांना पी एच डी ही पदवी प्रदान केली आहे या यशाबद्दल त्यांचे शिक्षणप्रेमीं कडून त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक होत आहे
कृषी विभागात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले साकत ता जामखेड येथील वैभव साळवे यांच्या प्रा अश्विनी गायकवाड या पत्नी आहेत ही पी एच डी पदवी मिळविताना प्रा गायकवाड यांना डॉ यतीशसाचिदानंद यांचे मार्गदर्शन व वैभव साळवे यांचे प्रोत्साहन कामी आले
या यशाबद्दल पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, सचिव शशिकांत देशमुख, उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, खजिनदार राजेंद्र मोरे , जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य ए बी फलके , उपप्राचार्य प्रा डॉ नरके , प्रा डॉ कांबळे , प्राध्यापिका डॉ देशपांडे व प्राध्यापिका साबळे , कार्यालय अधीक्षक श्री बांगर यांचेसह सर्व प्राध्यापक ,सेवक व विद्यार्थी यांनी प्रा अश्विनी गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे





