खुशखबर! ! खुशखबर!! लवकरच स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

0
232
जामखेड न्युज – – – – 
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) प्रोग्राम अंतर्गत इथेनॉलवरील जीएसटी दर 18% वरून 5% पर्यंत कमी केला आहे. दरम्यान, EBP प्रोग्राम अंतर्गत, इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते. पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
केंद्रातील मोदी सरकारने 2018 मध्ये पहिल्यांदा इथेनॉल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर आधारित इथेनॉलचे दर निश्चित केले होते. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीचे प्रमाणही वाढलं आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष (ISY) 2013-14 मधील 38 कोटी लिटरवरून त्यात ISY वर्ष 2020-21 मध्ये 350 कोटी लिटरपर्यंत वाढ झाली आहे.
पेट्रोल-डिझेल तसेच सीएनजीचा इंधनाचा वापर अधिक प्रमाणात करण्यात येतो. तसेच इंधनांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल परदेशातून आयात देखील करावा लागतो. त्यामुळे परिवहन तसेच अन्य कारणांसाठी होत असलेला इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले आहे.
दरम्यान सरकारने गेल्या महिन्यात उसापासून काढलेल्या इथेनॉलच्या किमती पेट्रोलमध्ये 1.47 रुपयांनी वाढवल्या होत्या. पेट्रोलमध्ये अधिक इथेनॉल मिसळल्याने प्रदूषणही कमी होते आणि शेतकऱ्यांना वेगळे उत्पन्न मिळवण्याचा मार्ग मिळतो, असे सरकारचे म्हणणे आहे. सरकारच्या या नवीन धोरणामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमतीत लवकरच घट होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here