जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय संकुलामध्ये पद्मविभूषण खासदार माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला ,रांगोळी ,वक्तृत्व, निबंध स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागेश विद्यालय व कन्या विद्यालयातील स्पर्धकांनी सहभाग घेतला तसेच 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर श्री नागेश विद्यालय युनिट क्र.२३३/२ या नूतन बोर्डचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर, प्रमुख उपस्थिती सभापती सूर्यकांत (नाना) मोरे, कन्या विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष मधुकर( आबा) राळेभात ,सुरेश भोसले, प्रकाश भाऊ सदाफुले, माजी सहसचिव भोसले एम के, प्राचार्य मडके बी के, उपप्राचार्य तांबे पी एन, मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी, पर्यवेक्षक साळवे डी एन व प्रकाश सोनवणे, माजी सैनिक तालुका अध्यक्ष बजरंग डोके, मंगेश आजबे, वैजनाथ पोले, शिवनेरी अकॅडमीचे संचालक निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे , नगरसेवक दिगंबर चव्हाण ,सरपंच बापूसाहेब कार्ले, इस्माईल सय्यद, विनायक राऊत प्रा राहुल आहेरे, उमर कुरेशी, मोहन यादव , रमेश बोलभट, संतोष ससाणे,संतोष सरसमकर ,एनसीसी ऑफिसर मयुर भोसले,संजय हजारे, आदी मान्यावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नागेश विद्यालयचे प्राचार्य मडके बी के यांनी केले.
सुरुवातीस कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मूर्तीचे पूजन करून राष्ट्रीय छात्र सेनेच्या 17 महाराष्ट्र बटालियन एन सी सी बोर्ड चे उद्घाटन करण्यात आले व बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला.
माजी सहसचिव भोसले एम के, सूर्यकांत नाना मोरे, सुरेश भोसले, प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ बेलेकर यांनी पवार साहेब यांच्या कार्याची माहिती अध्यक्षीय भाषण मध्ये केले.
सुत्रसंचलन संतोष ससाने प्रा. विनोद सावडकर, रमेश बोलभट व आभारप्रदर्शन मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी यांनी केले.