जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जो देश इतिहास विसरतो त्या देशाचा भूगोल बदलतो. आपल्या देशाचा इतिहास महान आहे. आपल्या सैन्याचा पराक्रम महान आहे. पराक्रम पासून प्रेरणा मिळते. आपले सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानून मोठ मोठे पराक्रम गाजवतात भारतीय सैन्य हे जगातील एकमेवाद्वितीय सैन्य आहे. असे मत सुभेदार सदानंद होशिंग यांनी व्यक्त केले.
सुवर्णमहोत्सवी बांगलादेश विजयदिन ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार सदानंद बाळकृष्ण होशिंग, शिवनेरी अकॅडमीचे प्रमुख कॅप्टन लक्ष्मण भोरे, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग डोके मेजर, सुभेदार दिनकरराव भोरे, हवालदार कांतीलाल कवादे, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, कॅप्टन विजय केळकर, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पी. टी गायकवाड, कॅडर मुळिक निखील, संजय कदम, राघवेंद्र धनलगडे यांच्या सह तालुक्यातील एनसीसी विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.
सुवर्ण महोत्सवी बांगलादेश विजय दिनानिमित्त बोलताना लढाईचे हुबेहुब अंगावर शहारे आणणारे चित्र घटना कथन केल्या व परमवीर चक्र मिळवणाऱ्या शूर भारतीय सैनिकांविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी बोलताना सदानंद होशिंग युद्धाबद्दल सविस्तर माहिती दिली पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी 93,000 सैनिकांसह भारतीय लष्कर आणि बांग्लादेशच्या मुक्ती वाहिनीच्या संयुक्त सैन्यापुढे शरणागती पत्करल्यानंतर युद्ध संपले. 16 डिसेंबर 1971 रोजी जनरल ए के नियाझी यांनी ढाका येथे आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे पूर्व पाकिस्तानमध्ये नवीन राष्ट्र म्हणून बांग्लादेशची निर्मिती झाली. बांगलादेशच्या जन्माबरोबरच पाकिस्ताननेही आपला निम्मा भूभाग गमावला.
हे युद्ध फक्त 13 दिवस चालले
दररोज १२५० क्वेअर सेंटिमीटर प्रदेश भारतीय सैन्य दररोज जिंकत होते. हे युद्ध केवळ 13 दिवस चालले आणि इतिहासातील सर्वात लहान युद्धांपैकी एक मानले जाते. पण त्याचा निकाल आजही पाकिस्तानला पराभवाची आठवण करून देतो. 3 डिसेंबर 1971 ते 16 डिसेंबर 1971 दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष झाला. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकायला भाग पाडले त्यांचे 93,000 सैनिक पकडले आणि बांगलादेशातील 75 दशलक्ष लोकांना स्वातंत्र्य मिळवून दिले.पूर्व पाकिस्तानातील बंगाली लोकसंख्येवर पाकिस्तानने केलेला नरसंहार संपवण्यासाठी या युद्धात भारताचे 3000 सैनिक हुतात्मा झाले. यासोबतच पाकिस्तानचे 8000 जवान मारले गेले. आणि या युद्धानंतर बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख यांनी ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल प्राचार्य व सर्व स्टाफचे कौतुक केले. व सैन्यातील शिस्तीविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी पराक्रमी सैन्यांची घोषवाक्य तसेच सैनिकांविषयी गीत गायन केले.
कार्यक्रमात पाच माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच एनसीसी कॅडेट निखिल मुळिक यांनी स्वतः चा तलफ सेंद्रिय गुळाचा चहा ब्रॅड बनवून ५५ युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल देडे यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांनी मानले.