रोहित पवारांच्या हस्ते होणार मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन, मतदारसंघातील नागरिकांना होणार फायदा 

0
227
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – 
 पद्मविभूषण माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था अहमदनगर जिल्हा आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 06 वाजून 30 मिनिटांनी या या शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार रोहित (दादा) पवार यांच्या हस्ते जामखेड येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात येणार आहे.
14 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच  22 व 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे देखील आयोजन कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात आले आहे. जनरल आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत दमा, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडाचे आजार आणि अस्थीरोग या आजारांबाबत प्राथमिक तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार करण्यात येणार आहेत. तसेच डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबीरांतर्गत मोतीबिंदू, तिरळेपणा या आजारांबाबत प्राथमिक तपासणी करून चष्म्यांचे वाटप केलं जाणार आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शासकीय योजनेमार्फत गरज पडल्यास शस्त्रक्रिया करण्यासाठी देखील सहकार्य करण्यात येणार आहे.
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये वंध्यत्व अपत्यप्राप्ती न होणे दात जबडा सर्जरी पोट दुभंगणे व फाटणे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी अपंगत्वाचा दाखला मिळणे व महिलांचे आजार या संदर्भातील नोंदणीही करता येणार आहे. त्यासाठी 9696330330 या क्रमांकावर संपर्क साधून इच्छुक नागरिकांनी नोंदणी करायची आहे. या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घ्यावा असे आवाहन कर्जत जामखेडचे आमदार रोहित (दादा) पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here