Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या दुःखद: बातमी— देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत हेलिकॉप्टर दुर्घटनेत...

दुःखद: बातमी— देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन

0
242
जामखेड न्युज – – – 
आज तामिळनाडूमध्ये मध्ये दुपारी झालेल्या एका लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स बिपिन रावत यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये रावत यांचे कुटुंबीय होते त्यांच्या पत्नी मधुरिका यांचाही मृत्यू झाला आहे, लष्कराने या वृताची अधिकृत माहिती दिली आहे.
आज सकाळी तामिळनाडू आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या कुंनूर येथील लष्कराच्या बेस कॅम्प जवळ  निलगिरी पर्वत रांगेत हा अपघात झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा मृत्यू या ठिकाणाहून काढण्यात आलेले आहेत. तेरा जणांचा यात मृत्यू झाल्याचे ANI ने स्पष्ट केले आहे
 या हेलिकॉप्टरमध्ये एकूण चौदा जण होते त्यामध्ये चार जण  क्रू मेंबर होते. तर दहा प्रवासी होते , हे सर्व लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यात ब्रिगेडीयर एल एस लीडर,  लेफ्टनंट कर्नल रजिंदर सिंह, नायक गुरू सेवक सिंग,नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार,  लान्स नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल आदी चौदा जण होते यातील अकरा जणांचे मृतदेह येथून आढळल्याचे  स्थानिकांनी माहिती दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!