जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड येथील राहणारे सुप्रसिद्ध कवी प्रा. आ.य.पवार लिखित ‘धूळपेर’ काव्यसंग्रह कर्नाटक विद्यापीठाच्या बी.ए. पदवी अभ्यासक्रमासाठी द्वितीय सत्रास पाठ्यपुस्तक म्हणून निवडण्यात आला आहे. यावर्षीपासून मराठी
विषयाच्या नवीन अभ्यासक्रमात ‘धूळपेर’ चा पाठ्यपुस्तक म्हणून समावेश केल्याचे विद्यापीठाने प्रा.पवार यांना कळविले आहे.
निसर्ग, समाज, शेतकरी जीवन, विज्ञान, पर्यावरण, आदी विषयांवरील ६२ कवितांचा समावेश ‘धूळपेर’ काव्यसंग्रहात आहे.यापूर्वी ‘धूळपेर’ मधील विज्ञान कवितांचा समावेश
नांदेड व नागपूर विद्यापीठाच्या पदवी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात झालेला आहे. कर्नाटक विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी पवारांच्या काव्यसंग्रहाची निवड झाल्याने प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, कर्मयोगी डॉ ए.बी.चेडे, डॉ.राजाराम सोनटक्के, डॉ.के.ए.
काशीद, कुंडल राळेभात, प्रा.बोडखे , आदीसह विविध
मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. धूळपेर
काव्यसंग्रहास पुणे, नागपूर, हिंगोली येथील संस्थेचे
राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेले असून कवी
पवारांचा हा पाचवा काव्यसंग्रह आहे.









