जामखेडमध्ये गोर बंजारा गौरव दिन उत्साहात साजरा

0
248
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – 
   महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आजच्या दिवशी शपथ ग्रहण केली होती तो दिवस संपुर्ण देशभरात गोर बंजारा गौरव दिन साजरा केला जातो. कर्जत-जामखेड मधील बंजारा कर्मचारी बांधवांच्या वतीने
शिक्षक  काॅलनी येथे गोर बंजारा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
दि.5 डिसेंबर 1963 रोजी हरितक्रांतीचे प्रणेते,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक, वसंतराव नाईक साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली होती म्हणून सर्व बंजारा बांधव हा दिवस गोर बंजारा गौरव दिवस महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर साजरा करतात त्यानिमित्त आज दि.5 डिसेंबर 2021 रोजी बंजारा कर्मचारी कर्जत-जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक कॉलनी जामखेड जि.अहमदनगर येथे गोर बंजारा गौरव दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास बालाजी चव्हाण सर, बळीराम जाधव सर, राजेश्वर पवार सर, ज्ञानेश्वर  राठोड सर, किरण पवार सर, प्रकाश चव्हाण सर, किशोर राठोड सर, संदीप चव्हाण सर, सचिन राठोड (जामखेड पोलीस), प्रकाश राठोड सर, विष्णू राठोड सर  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.विठ्ठल पवार सर यांनी केले
यावेळी वसंतराव नाईक साहेबांच्या जीवन कार्यावर,श्री.राहुल चव्हाण,श्री.किशोर राठोड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर राहुल चव्हाण सर यांनी सर्व उपस्थित बांधवांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here