लसीकरण केले नसल्यास व्यवसायीक आस्थापना अनिश्चित काळासाठी शिल करण्यात येईल – मुख्याधिकारी

0
236
जामखेड प्रतिनिधी 
                जामखेड न्युज – – – 
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्ण रोखण्यासाठी किंवा येणाऱ्या कोणत्याही लाटेस जिल्हाबहेरच रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढलेला आदेश दि. २७/११/२०२१ अन्वये प्रमाणे संबंधित असलेल्यांनी संपुर्ण लसीकरण करणे कामी हलगर्जीपणा केल्याची बाब मुख्याधिकारी व नगर परिषदेच्या पथकाच्या लक्षात आल्यास त्यांचे दुकान आस्थापना, मॉल, मंगल कार्यालये, आदि व्यवसायीक आस्थापना अनिश्चित काळासाठी शिल करण्यात येईल असा इशारा जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिला आहे.
या बाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,
जामखेड शहरातील सर्व दुकानदार, आस्थापना, मॉल, मंगल कार्यालये, आदि सर्वच व्यवसायीक आस्थापना येथील मालक, कामगार किंवा संबंधित व्यक्ती यांनी कोरोना लसीकरण केले किंवा नाही याबाबत जामखेड नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत माहे आॅक्टोबर २०२१ मध्ये सर्वेक्षण केलेले आहे.
 शासनाने विहीत केलेल्या वयोगटातील ज्या व्यक्तींनी लसीकरण करून घेतले नाही त्यांना कोरोना प्रतिबंधक उपाय योजना म्हणून लसीकरण करून घेणेबाबत नगर परिषदे मार्फत सुचना दिलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दि. २७/११/२०२१ काढलेल्या आदेशानुसार जामखेड शहरातील सर्व दुकानदार, आस्थापना, मॉल, मंगल कार्यालये, आदि सर्वच व्यवसायीक आस्थापना येथील मालक, कामगार किंवा संबंधित व्यक्ती व त्यांच्याकडे येणार अभ्यागत किंवा ग्राहक यांनी संपुर्ण लसीकरण केलेले हवे असे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
     संपुर्ण लसीकरण म्हणजे लसीच्या दोन्ही मात्र घेतलेल्या आहेत व दुसरा डोस घेऊन १४ दिवस पुर्ण अशी कोणतीही व्यक्ती, ज्या व्यक्तीची वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्या मुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टरचे प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती. ३)१८ वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती.
 वरील प्रमाणे संबंधित असलेल्यांनी संपुर्ण लसीकरण करणे कामी हलगर्जीपणा केल्याची बाब मुख्याधिकारी व नगर परिषदेच्या पथकाच्या लक्षात आल्यास त्यांचे दुकान किंवा आस्थापना, मॉल, मंगल कार्यालये, आदि सर्वच व्यवसायीक आस्थापना अनिश्चित काळासाठी शिल करण्यात येईल असा इशारा जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here