जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जिल्ह्य़ातील १ हजार १२८ सेवा सोसायट्या व पतसंस्थांची निवडणूक होणार असून यासाठी संबंधित संस्थाचे पदाधिकारी व सचिवांना संस्थेच्या प्रारूप मतदार याद्या संस्थेचे निबंधक यांच्याकडे सादर करण्याचे आदेश उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिले आहेत.
ग्रामीण भागातील राजकारणवर प्रभाव ठेवायचा तर स्थानिक पातळीवरील संस्था ताब्यात असणे आवश्यक असते. सेवा सोसायट्या व पतसंस्था ग्रामीण भागातील अर्थिक प्रगतीचा कणा आहेत. ज्यांच्या ताब्यात या संस्था असतात त्यांचा राजकारणात प्रभाव असतो. निवडणूका जाहिर झाल्याने स्थानिक पातळीवर खलबते सुरू झाली आहेत.
ADVERTISEMENT

एकंदर नगर जिल्ह्य़ात जाहीर झालेल्या निवडणूकांमधे नगर ८३, संगमनेर९५, आकोले ७२, कोपरगाव ९३, राहता ६२, राहुरी ८९, श्रीरामपूर ५६, नेवासे ११९, शेवगाव ५६, पाथर्डी ७६, जामखेड ४६, कर्जत ६३, श्रीगोंद १२४,पारनेर तालुक्यातील ९४ अशा १ हजार १२८संस्था निवडणुकीस पात्र आहेत. जर संस्थांनी प्रारूप मतदार यादी वेळेनुसार सादर केली नाही. तर सहकार कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल असा इशारा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिला आहे.
सेवा सोसायट्यांची जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत महत्वाची भुमिका असते.