जामखेड न्युज – – – –
गेल्या काही दिवसात देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत प्रदूषण मोठया प्रमाणात वाढले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी येत्या शनिवार, 27 नोव्हेंबरपासून दिल्लीत केवळ सीएनजी वाहनांनाच परवानगी देण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे.
ADVERTISEMENT

सीएनजीवर चालणारीच वाहने दिल्लीत प्रवेश करू शकणार आहेत. सीएनजीवर चालणारे ट्रक , टेम्पोच दिल्लीत प्रवेश करू शकणार आहेत. दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी आज माहिती दिली. प्रदूषण वाढल्याने उपाययोजना केल्या जात आहेत.
अत्यावश्यक सामानांची वाहतूक न करणाऱ्या अवजड वाहनांना 22 नोव्हेंबरपासून दिल्लीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही बंदी 3 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा कॉलेजे आणि सरकारी कार्यालयेही बंद राहणार आहेत.