जामखेड न्युज – – –
गेली पाच वर्षांपासून ते आजपर्यत संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियाच्या माध्यमातून व स्वतःच्याच हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून व स्वतः मुला मुलींच्या गावी जाऊन मध्यस्थी करून आजपर्यत सर्वधर्मीय मुलामुलींचे दोनशे पेक्षा अधिक विवाह जमवुन दिले आहेत या सर्वाचा संसार व्यवस्थित गुण्यागोविंदाने चालला आहे.
अल्पवधीतच श्री सुभाष ढवळे यांचे हे कार्य महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यातील जनतेला व्हाॅटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून माहीत झाले या चार राज्यातील जनतेने श्री सुभाष ढवळे यांचे कार्य सातत्याने जवळून पाहत आहे गेल्या पाच वर्षात श्री सुभाष ढवळे यांचा महाराष्ट्रात विविध ठिकाणी राजकीय.सामाजिक आणि इतरही संस्था आणि मित्रमंडळ यांनी सुद्धा मान.सन्मान केलेले आहेत.
ADVERTISEMENT

या कार्याची दखल घेत राष्ट्रीय वारकरी परीषद व हरिप्रसाद यात्रा ग्रुप यांच्या वतीने श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी शतकोत्तर रौप्य महोस्तवी वर्ष ७२५ सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह दि २८.११.२०२१ ते २.१२.२०२१ रोजी सांगता आहे या कार्यक्रमात दि.२८.११.२०२१ वार रविवार रोजी दुपारी १.०० वा. ढवळे वधु वर सुचक श्रीगोंदा येथील अध्यक्ष श्री सुभाष ढवळे यांना महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार आणि विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजक हरिप्रसाद यात्रा ग्रुप चे अध्यक्ष ह.भ. प श्री कृपेन गुरव महाराज आणि ह.भ. प .श्री जालिंदर महाराज मोरेआळंदी यांनी सांगितले आहे श्री क्षेत्र आळंदी येथे समाधी सोहळा आणि हरिनाम सप्ताह याचा महाराष्ट्रातील जनतेने व आपणही आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पुरस्कार प्राप्त श्री सुभाष ढवळे श्रीगोंदा यांनी केले आहे. इच्छुकांनी विवाह जुळवण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क नंबर 9359587117 .9730608648 टाकावा