जामखेड न्युज – – – –
मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत आहे.
1) न्यायालयाने मान्यता दिलेले ५℅ मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.
2) धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे *पैगंबर मोहम्मद बिल* वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे. ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.
3) महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकतीमध्ये वाढ करून इमाम, व मुअज्जिन आणि खुद्दाम हजरात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
4) संत विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या ह भ प कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
5)वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैद्य कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.
6) सारथी बार्टी महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.
ADVERTISEMENT

या सर्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड डॉ .अरुण (आबा) जाधव म्हणाले की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मुस्लिम बांधव चालतो. इंग्रजांच्या विरुद्ध बंड करतानी मुस्लिम चालतो. देशाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये मुस्लिम बांधव शहीद झाले .या देशातील इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी मुस्लिम बांधवांनी रात्र दिवस लढत होता. ज्यांना तिरंगा मान्य नाही आमचा मुस्लिम बांधव तिरंगा खांद्यावर घेऊन चालतो. व देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मुस्लिम भटके-विमुक्त ,आदिवासी ओबीसी ,यांचा सगळ्यांचा हात आहे हा देश संविधानावर चालतो सगळ्यांना समान अधिकार आहे. अशी भूमिका राज्यसमन्वयक भ.वि. आघाडी,म.राज्य अॅड. डॉ अरुण जाधव यांनी मांडली व बापू ओहोळ लो.अ प्रवक्ते तसेच मौलाना खलील यांनी आपली भूमिका मांडली या धरणे आंदोलनात उपस्थित अतिश पारवे (ता. अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), सय्यद मुक्तार (मुस्लिम नेते), अजहर काझी, डॉ खलील,रोपखानसाहब ,ताहेर भाई पठाण, आजिनाथ शिंदे (जामखेड शहरअध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), विशाल पवार, गणपत कराळे, सुधीर कदम, मच्छिंद्र जाधव, राकेश साळवे, राजू शिंदे , संतोष चव्हाण, सागर ससाने, मोहन शिंदे ,अशोक ससाने,संदिप ससाने, उमेश पवार ,अक्षय समुद्र ,चंदन अंधारे,रोहित पवार ,दिनेश ओहोळ, सुविकास काळे उपस्थित होते