Home ताज्या बातम्या भरधाव पिकअपच्या धडकेत सिद्धेश्वर म्हेत्रे यांचा मृत्यू, जामखेड परिसरात शोककळा अतिक्रमण व...

भरधाव पिकअपच्या धडकेत सिद्धेश्वर म्हेत्रे यांचा मृत्यू, जामखेड परिसरात शोककळा अतिक्रमण व वाहतूक कोंडीमुळे अपघातांची मालिका सुरूच – नागरिकांतून संताप

0
3

जामखेड न्युज – – – – – – 

भरधाव पिकअपच्या धडकेत सिद्धेश्वर म्हेत्रे यांचा मृत्यू, जामखेड परिसरात शोककळा

अतिक्रमण व वाहतूक कोंडीमुळे अपघातांची मालिका सुरूच – नागरिकांतून संताप

शहरातील वाढते अतिक्रमण, वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आणि अनियंत्रित वाहन पार्किंग यामुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. यातच शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जामखेड-बीड रोडवर भीषण अपघात झाला.

मुंढे हॉस्पिटलसमोर रस्त्याच्या कडेला मोटारसायकलवर उभे असलेले सिद्धेश्वर गणेश म्हेत्रे (वय 32, रा. जामखेड) यांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सिद्धेश्वरच्या
डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या म्हेत्रे यांना नागरिकांनी तातडीने खाजगी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अतिक्रमण ठरतेय मृत्यूचे सापळे

जामखेड शहरातील मुख्य रस्ते, विशेषतः बीड रोड, खर्डा चौक, बसस्थानक परिसर टपऱ्या, हातगाडे, बेकायदा पार्किंगने व्यापले आहेत. रस्ता ५० फुटांचा असला तरी चालण्यासाठी जागा १० फूटही शिल्लक नाही. सर्वसामान्य नागरिक, शाळकरी मुले, वृद्ध यांना जीव मुठीत धरून चालावे लागते.

या गंभीर परिस्थितीमुळे अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला असून, अनेक जण कायमचे अपंगत्व घेऊन जगत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक व जीवितहानी होत आहे.

घटनास्थळी हळहळ

सिद्धेश्वर हे मनमिळाऊ स्वभावाचे व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले युवक होते. केटरिंग करून कुटुंबाचा आधार बनले होते. त्यांच्या अकाली जाण्याने म्हेत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवार व जामखेड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चौकट
अतिक्रमण हटवा, बळी थांबवा, या घटनेनंतर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बीड रोड, नगर रोडवरील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवा, स्पीड ब्रेकर, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग तातडीने बसवा, CCTV यंत्रणा कार्यान्वित करा व बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करा. अशी मागणी करण्यात आली आहे. 

(सामाजिक कार्यकर्ते अवधुत पवार)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!