नगर जिल्ह्यात सात दिवस १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी – जिल्हाधिकारी

0
261
जामखेड न्युज – – – 
अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत पाच किंवा पाचपेक्षा अधीक व्यक्तींनी एकत्र येवू नये या करता दिनांक २२नोव्हेंबर पासून ते  दिनांक २८ नोव्हेंबर पर्यंत फौजदारी प्रक्रीया संहीता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश  जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी सदर आदेश जारी केले आहेत.
                        ADVERTISEMENT
     
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्हाअधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रा नुसार अहमदनगर जिल्हयात विविध राजकीय पक्ष, संघटना यांचे वतीने विविध मागण्यांसाठी रास्तारोको, मोर्चे, धरणेआंदोलन, इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयसमोर होत असतात. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
तसेच एस.टी.महामंडळाचे विविध संघटनानी एस.टी.कर्मचा-यांचे विलगीकरण राज्य शासनामध्ये व्हावे, कर्जमाफी, कामगार करार इत्यादी मागण्यांसाठी बंद पुकारलेला असून अहमदनगर जिल्हयात 11 ठिकाणी एस.टी.महामंडळ कर्मचा-यांचे आंदोलने चालू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात १४४ कलमा नुसार जमावबंदीचे लागू केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here