जामखेड न्युज – – – –
अरबी समुद्र (Arabian Sea) आणि बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (Low Pressure Area) ओसरल्यानंतर, दक्षिण अंदमान समुद्र (South Andman Sea) आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर (Thailand Coast) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील काही दिवसांत याचं चक्रिवादळात (Cyclone) रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात (Rain alert in maharashtra) आला आहे. पुढील पाचही दिवस अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 

हवामान खात्याने आज पुण्यासह एकूण 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील 3-4 तासांत संबंधित जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हीच स्थिती कायम राहणार आहे.
ADVERTISEMENT 

दुसरीकडे, दक्षिण अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता 15 नोव्हेंबरनंतर वाढणार आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची व्याप्ती आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून उत्तरेकडील थंड हवेचा जोर कमी झाला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ नोंदली आहे.