जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
‘रोहितच्या व्हिजनमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आली आहे त्या दृष्टीने अत्यंत चांगले काम सुरू आहे.विकास होत असताना एका व्यक्तीमुळे होत नाही त्याला सर्वांची साथ असावी लागते.त्यामुळे येणाऱ्या काळात पार पडणाऱ्या निवडणुकीत एका विचारांची माणसे असतील तर कायापालट करायला वेळ लागणार नाही.आमदार एका विचारांचा व खालची टिम एका विचाराची असली की तिथे खुप राजकारण होते.शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत.कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटात ही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार विकासकामे केली पाहिजेत असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT

मतदारसंघातील कर्जत व जामखेड शहर व दोन्ही तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण,महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,आ.रोहीत पवार,आ.लहू कानडे, आ.निलेश लंके, आ.संग्राम जगताप,राजेंद्र पवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ADVERTISEMENT 

प्रस्ताविकात आ.रोहित पवार म्हणाले,गेली दोन वर्षात कोरोनावर काम करत असताना विविध खात्यांकडे पाठपुरावा करून अनेक विभागातील कामे मार्गी लावली.तेरा वर्षानंतर एका व्यक्तीला पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करावे लागले.कारण त्यांचा लोकांमधला संपर्क तुटला.लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच आम्ही लोकांमध्ये राहतो.अगोदर जे लोकप्रतिनिधी होते ते मंत्री असूनही दोन वर्षात त्यांच्यापेक्षा दुप्पट अंतराचे म्हणजे २५० किमी पेक्षा जास्त अंतराचे रस्ते मंजुर करून आणले.आता मतदारसंघात गटातटाचे नव्हे तर फक्त विकासाचे राजकारण केले जाणार आहे.
ADVERTISEMENT 

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले, विकासाने झपाटलेला माणुस ज्याला म्हणू अशा पद्धतीने मतदारसंघाच्या विकासाची भुमिका घेऊन रोहितदादा ज्या पद्धतीने काम करत आहे त्याबद्दल मी अभिनंदन करतो.लोकप्रतिनिधी आमदार कसा असावा? तो रोहितदादांसारखा असावा.त्यांचे काम पाहून मी थक्क झालो आहे.दूरदृष्टी ठेऊन येथील सर्व कामांचा आराखडा तयार केला.मागील दोन वर्षांत कर्जत-जामखेड मध्ये ९८ कामांच्या माध्यमातून ६३७ कोटींची कामे मंजूर करण्यात आली. रस्ते कामासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात आला हे उल्लेखनीय आहे.
ADVERTISEMENT 

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,मतदारसंघासाठी आ.रोहित पवार यांनी अधिकचा निधी खेचुन आणला.कर्जत जामखेडकर नशीबवान आहेत ज्यांना चांगला प्रतिनिधी लाभला.कसलाही अविर्भाव न आणता प्रत्येक मंत्र्यांच्या केबिनमध्ये जाऊन ते मतदारसंघासाठी काय आणता येईल?याचाच कायम प्रयत्न करत असतात. विकासकामांच्या बाबतीत बारामतीनंतर आता कर्जतचा नंबर येतो की काय?असे वाटू लागले आहे.
महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले,प्रा.राम शिंदे यांनी मतदारसंघात इतकी वर्षे काम केलं तरी अजुन इतकं काम बाकी कसे राहिले याचे आश्चर्य वाटते.पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी लोकांनी रोहित पवारांकडे दिली.कोरोना नसता तर अजुन मोठा निधी आणला असता.प्रत्येक काम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम अजित पवारांनी केले.केंद्रात दोन विकणारे आणि बाकी खरेदी करणारे असे एवढेच काम सुरू आहे.चौकशी, ईडी-सीडी लावून केवळ बदनामीचे काम सुरू आहे.मात्र पारदर्शक कामामुळे पवार महाराष्ट्रामध्ये पावरफुल आहेत.
विविध कामांच्या माध्यमातून बदलत असलेल्या कर्जत-जामखेडच्या विकास कामांची चित्रफीत उपस्थित नागरिकांना दाखवण्यात आली.कार्यक्रमापूर्वी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास व कर्जत येथील ग्रामदैवत गोदड महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार व उपस्थितांनी अभिवादन केले.