होय… यालाच म्हणतात नवे पर्व – राजेंद्र कोठारी २२७ कोटींच्या  विकास कामांचा उपमुख्यमंत्री मा.ना. श्री.अजितदादा पवारांच्या हस्ते भव्य शुभारंभ

0
260
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जामखेड शहरासाठी १४० कोटींच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचा, तसेच जामखेड शहरातील व तालुक्यातील अशा २२७ कोटी ७७ लाख ६६हजार रकमेच्या विविध विकासकामांचा एकत्रित भूमिपूजन सोहळा दि १३  रोजी  उपमुख्यमंत्री तथा मंत्री- वित्त व नियोजन मंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महसूल व ग्रामविकास  राज्यमंत्री मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत जामखेड येथील बाजार तळावर वेळ: सायंकाळी ५.३० वाजता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी दिली.
                     ADVERTISEMENT
  जामखेड शहर व अंतर्गत वाड्या वस्त्यांसाठी उजनी धरणातून १४० कोटी पाणीपुरवठा योजना जामखेड शहरातील रस्त्यांसाठी १५ कोटी सार्वजनिक सभागृहासाठी १ कोटी ५०लाख तालुक्यातील तलाठी कार्यालयासाठी ८कोटी ८२लाख २८हजार व्यापारी संकुलासाठी ९कोटी  शासकीय विश्रामगृहासाठी ४कोटी ३०लाख ७०हजार पंचायत समितीच्या दुसर्‍या मजल्यावरील कार्यालयासाठी ३कोटी ८८लाख ९० हजार तसेच पंचायत समितीच्या पदाधिकारी व कर्मचारी निवासस्थाना साठी १०कोटी ९१लाख पोलीस अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी ८कोटी ८९लाख महसूल कर्मचारी निवासस्थानासाठी १२कोटी ६लाख ७८हजार बसस्थानक व बसस्थानकावर व्यापारी संकुलासाठी ७कोटी ८९लाख सार्वजनिक वाचनालयासाठी १कोटी ५०लाख नाना नानी पाकँ साठी २कोटी तपनेश्वर आमरधाम साठी २ कोटी असे एकुण २२७ कोटी ७७ लाख ६६ हजार निधीच्या कामांचे भूमिपूजन होणार आहे.
                       ADVERTISEMENT 
      यातील बसस्थानक व पोलीस वसाहतीचे काम सुरू झाले आहे.जामखेड शहरासाठी एवढा मोठा निधी आणल्याबद्दल मा. आमदार  रोहितदादा पवार यांनी  निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार व त्यांच्या सर्व मंत्री मंडळातील सहका-यांचे मी जामखेड तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहीर आभार मानतो. व आपण सर्वांनी नक्की या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती करतो. असे आमदार रोहित पवारांनी  केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here