बैलगाडीच्या चाकाखाली सापडून बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

0
393
जामखेड न्युज – – – 
शेतामधून गुरासाठी बैलगाडीतून चारा घेऊन घराकडे जात
असताना बैलगाडीच्या चाकाखाली सापडून एका बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे ही घटना घडली असून मृत्यू झालेल्या मुलाचे योगेश सोमनाथ नरोटे असे आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
                       ADVERTISEMENT
 
 बुधवारी (१० नोव्हेंबर) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमार हा दुर्देवी अपघात झाला. योगेश त्यांच्या स्वतःच्या मालकीची बैल गाडीतून शेतामधून गुरासाठी चारा घेऊन घराकडे जात होता. मेळवस्ती ह्या त्यांच्या राहत्या घराजवळच योगेश हा बैलगाडीतून खाली पडला. त्यावेळी डोक्यावरून बैलगाडीचे चाक गेल्याने मोठा रक्तश्राव होऊन त्यात मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला तत्काळ उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
                     ADVERTISEMENT  
   योगेशचे वडिल शेतकरी आणि गरीब कुटुंबातील आहे. या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. योगेश हा त्याच्या आई- वडिला एकुलता एक मुलगा असून एक मोठी बहिण आहे. तो आदर्श विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत होता. घरातील आई-वडिलांबरोबर शेतीचे व घरातील छोटे मोठे काम योगेश करत होता. त्याचा मृत्यू झाल्याने परिसर हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here