जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – ( सुदाम वराट)
परिसरातील वाचकांसाठी शहरातील लोकमान्य वाचनालयाने अनोखी योजना आणली आहे. एक रूपयात एक दिवाळी अंक वाचा शंभर दिवाळी अंक शंभर रुपये शंभर दिवस अशी अनोखी योजना आणलेली आहे या योजनेचा लाभ वाचक मंडळींनी घ्यावा असे आवाहन लोकमान्य वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 

शंभर दिवाळी अंक, शंभर दिवस, शंभर रूपयांमध्ये अशी अनोखी योजना वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आज तुमच्याकडे माहिती असणं फार गरजेचं आहे. बाहेरच्या असंख्य गोष्टींचा तुमच्यावर भडमार होत असतो. त्याला तोंड देण्यासाठी तुमच्याजवळ माहिती असायला हवी. म्हणजे ज्ञान असायला हवं. ते असेल तरच तुम्ही कुठल्याही प्रश्नांना पुरून उरू शकता. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात टिकण्यासाठी तुम्हाला वाचन करावंच लागतं. हिच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी लोकमान्य वाचनालयाने अनोखी योजना आणली आहे.
ADVERTISEMENT 

नगर जिल्ह्यातील मोजक्याच वाचनालयांनी शंभरी गाठली आहे. नगर शहरातील जिल्हा वाचनालय (सिटी लायब्ररी) सन 1838 मध्ये सुरू झाले. त्यानंतर संगमनेर, जामखेड येथे वाचनालये उघडली. जामखेडच्या लोकमान्य वाचनालयाला 125 वर्षे पूर्ण झालेली आहेत. सन 1887 मध्ये सुरू झालेल्या या वाचनालयात सध्या 29 हजारांवर पुस्तके आहेत. ग्रामपंचायत असलेल्या अन्य कुठल्या गावात इतका मोठा ग्रंथसंग्रह अभावानेच पाहायला मिळतो.
ADVERTISEMENT 

(कै.) वामनराव जीवनराव देशमुख यांनी गावातील ग्रंथप्रेमी मंडळींच्या सहकार्याने या वाचनालयाची स्थापना केली. त्या वेळी त्याचे नाव ‘व्हिक्टोरिया लायब्ररी’ होते. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. प्रतिसाद फारसा मिळत नव्हता, पण तशाही परिस्थितीत त्यांनी जुने ग्रंथ मिळवून वाचनालय चालू ठेवले. तेव्हा साक्षरता कमी असल्याने लोक पुस्तकाचे सामुदायिक वाचन करीत. एकजण वाचे अन् बाकीचे श्रवण करीत. नंतरच्या काळात गोविंद मनोहर देशमुख, माधव बळवंत देशमुख, वासुदेव कृष्णराव देशमुख यांनी वाचनालयाची धुरा सांभाळली. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्याच्या ऊर्मीने भारावलेला तो काळ होता. टिळकांचा केसरी वाचल्याशिवाय लोकांना चैन पडत नसे. चित्रमय जगत, रत्नाकर, मनोरंजन, नवयुग, लोकशक्ती, ज्ञानप्रकाश अशी नियतकालिके वाचनालयात येऊ लागली. त्यामुळे वाचकवर्ग वाढू लागला. दामोदर गोविंद देशमुख, भालचंद्र गोविंद देशमुख, अण्णासाहेब देशपांडे, अप्पासाहेब पोळ यांनी वाचनालयाचा आणखी विस्तार केला. वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या पुस्तकांनी त्या पिढीला वेड लावले होते. एके दिवशी गावातील तीन स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिशांनी अटक केली. त्यामुळे चिडलेल्या गावक-यांनी वाचनालयावर मोर्चा नेऊन ‘व्हिक्टोरिया लायब्ररी’ हे नाव बदलून ते ‘लोकमान्य वाचनालय’ असे केले. पुढे वाचनालयासाठी गावक-यांनी जागा दिली. त्यावर इमारत उभी राहिली. तेव्हाचे सरपंच मिश्रीलाल कोठारी यांचे त्यासाठी मोठे सहकार्य मिळाले. मधुकाका देशमुख, शांतिलिंग लोहकरे, भिडे गुरुजी, शेखलाल भाई, डॉ. महाजन, डॉ. डी. बी. खैरनार यांनी वाचनालयासाठी मोठे योगदान दिले. उद्धव देशमुख, वसंतराव पाठक, जी. एल. देशमुख, सुरेश मोरे, डी. के. पवार, शरद देशमुख, अरुण चिंतामणी, रमेश गुगळे, शशिकांत देशमुख या तरुण मंडळीनी वाचनालयाचा लौकिक आणखी वाढवला. याच काळात वाचनालयाची नाट्य शाखा सुरू झाली. या शाखेने सादर केलेल्या ‘कथा कुणाची व्यथा कुणा’ या नाटकाने तेव्हा राज्य नाट्य स्पर्धा गाजवली होती. सन 2006 मध्ये शासनाकडून वाचनालयाला 5 लाखांचे विशेष अनुदान मिळाले. त्यात 15 लाखांच्या लोकवर्गणीची भर घालून 5200 चौरस फुटांची भव्य वास्तू बांधण्यात आली. या इमारतीत आता ग्रंथालय, वाचनालयाच्या जोडीने महिला विभाग, बाल विभाग, अभ्यासिका व सभागृह आहे. शेतक-यांना उपयुक्त अशा पुस्तकांचा स्वतंत्र विभागही आहे. नव्या पिढीत वाचन संस्कृती वाढावी, म्हणून गावातील सुमारे 3 हजार 800 विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने वाचनालयाची ओळख करून देण्यात आली आहे. वाचनालयाच्या वतीने वक्तृत्व, निबंध, उत्कृष्ट वाचक, प्रज्ञाशोध अशा स्पर्धा घेतल्या जातात.
ADVERTISEMENT 

लोकमान्य वाचनालय असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असते म्हणून एका रूपयांमध्ये एक दिवस असे शंभर दिवस शंभर रुपये व शंभर दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
“दिपावली”
म्हटलं की,
फराळ
आणि…
“दिवाळी अंक !”
काही दिवस
मोबाईल थोडा बाजूला ठेवा…
आणि घ्या
मनसोक्त अस्वाद साहित्यिक फराळाचा !
असे आवाहन शशिकांत देशमुख – लोकमान्य वाचनालय
कोर्ट रोड, जामखेड यांनी केले आहे.
म्हटलं की,
फराळ
आणि…
“दिवाळी अंक !”
काही दिवस
मोबाईल थोडा बाजूला ठेवा…
आणि घ्या
मनसोक्त अस्वाद साहित्यिक फराळाचा !
असे आवाहन शशिकांत देशमुख – लोकमान्य वाचनालय
कोर्ट रोड, जामखेड यांनी केले आहे.