“जलयुक्त शिवार” नंतर आता ऊर्जा विभागाचीही चौकशी!! साडेसहा हजार कोटींची ठपका!!

0
222
जामखेड न्युज – – – – 
 राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आरोपांची राळ उडवणाऱ्या विरोधकांवरच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी निशाणा साधला आहे. फडणवीस सरकारच्या काळात म्हणजेच २०१४ ते २०१९ या काळात ऊर्जा विभागात इन्फ्रा दोन अंतर्गत झालेल्या साडे सहा हजार कोटींच्या कामावर ठपका ठेवण्यात आला आहे, तर ऊर्जा विभागातील इन्फ्रा एक अंतर्गत झालेल्या बारा हजार कोटींच्या कामांपैकी उर्वरित कामांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. सुमारे दहा हजार कोटींच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली आहे.
                       ADVERTISEMENT 
ऊर्जा विभागातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी इन्फ्रा एक अंतर्गत २००७ ते २०१३ या कालावधीत १२ हजार कोटींपेक्षा जास्त खर्चाची कामे करण्यात आली. मात्र, त्याला यश दिसून आले नाही. त्यानंतर इन्फ्रा २ अंतर्गत सहा हजार पाचशे कोटी रुपयांची कामे करण्यात आली. यामध्ये ग्राहकांना सुरळीत विद्युत पुरवठा होण्यासाठी अकरा केवी उच्च आणि लघुदाब वाहिन्या टाकणे, नवीन ट्रांसफार्मर टाकणे, अतिरिक्त पावर ट्रांसफार्मर बसविणे, रोहित्रची क्षमता वाढविणे, अंडरग्राउंड केबल टाकणे, नवीन ३० बाय ११ केव्ही उपकेंद्र निर्माण करणे इत्यादी कामे करण्यात आली. मात्र, तरीसुद्धा दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कामाची मागणी वाढलेलीच आहे.
                       ADVERTISEMENT 
      यामध्ये 33 केव्ही बाय 11 केवी उपकेंद्र उभारण्याची नवीन मागणी, १३२ केव्ही उपकेंद्र उभारण्याची नवीन मागणी आणि २२० केव्ही उपकेंद्र उभारण्याची नवीन मागणी यामुळे ३३७८ कोटी रुपयांची नवीन मागणी करण्यात आली आहे, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचं ऊर्जा मंत्र्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या सर्व कामांची गुणवत्ता आणि संख्या यामध्ये मोठा फरक आणि अनेक अनियमितता निदर्शनास येत आहे, असे उर्जाविभागाने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here