जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
कर्जत येथे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी एक सभाही झाली. सभेला गर्दी जमलेली असतानाच पावसाचे दमदार आगमन झाले. तरीही दोन्ही नेत्यांनी सभा तशीच सुरू ठेवली. पाऊस सुरू असूनही दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांची गर्दी कमी झाली नाही. राज्यभर या सभेची चर्चा सध्या रंगली आहे.
ADVERTISEMENT

हवामान विभागाने आज पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. सायंकाळी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनानंतर सभा झाली. या सभेला मोठी गर्दी जमली होती. खासदार सुजय विखे यांचे भाषण सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. तरीही कार्यकर्ते व समर्थक पावसात उभे राहून भाषण ऐकत असल्याचे पाहून या दोन्ही नेत्यांनी भाषणे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
ADVERTISEMENT 

खासदार सुजय विखे म्हणाले, सध्या कोरोना काळात अनेक जण अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत लोकांचे घराघरात मनोरंजन व्हावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने मंत्री नवाब मलिक व खासदार संजय राऊत या दोघांना नेमले आहे. ते दोघे उठसूठ बडबडतात. यंदा सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यासाठी विशेषत: कर्जत तालुक्यासाठी यंदा काळी दिवाळी आहे. महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई अजून दिली नाही. या सरकारला धडा शिकवण्यासाठी सज्ज राहा असे खासदार विखे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 

कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे झाले पुन्हा सक्रिय
ते पुढे म्हणाले, कर्जत तालुक्यातील लोकांचे व्यक्ती स्वातंत्र्य टिकवायचे असेल, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर राम शिंदे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
ADVERTISEMENT

विखेच्या भाषणाच्या शेवटी पावसाचे आगमऩ झाले. यावर खासदार विखे म्हणाले की, आज पावसामध्ये माझाही नंबर लागून गेला. या सभेच्या माध्यमांतून गोदड महाराजांचा आशीर्वाद मिळाला आहे. आगामी काळात सुखद घटना घडणार आहेत. पावसाच्या सभेत नंबर लागला, असे सांगत त्यांनी शरद पवारांच्या पावसातील सभेची आठवण विरोधकांना करून देत कोपरखळी मारली.
ADVERTISEMENT 

राम शिंदे म्हणाले, मला दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच जाहीर सभेत बोलायचे होते. पण पाऊस आला. मात्र हा पाऊस आवश्यक होता. महावितरण प्रशासनामुळे शेतीला पाणी मिळत नाही. त्यामुळे पिके सुकून चालली होती. अशात आलेला हा पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखावह आहे. मतदार संघात जलयुक्त शिवार व रस्त्याची कामे करूनही मला 2019 निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, असे म्हणत त्यांनी आपले मनातील शल्य व्यक्त केले.
यावेळा राम शिंदे याच्या कार्यकर्त्यांनी पाणीदार आमदार राम शिंदे अशा जोरदार घोषणा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात सचिन पोटरे यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. या कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, धांडेवाडीचे सरपंच काका धांडे, दादा सोनमाळी, पप्पू धोदाड आदींचीही भाषणे झाली.
तसेच आज दि. ६ वार शनिवारी चौंडी येथे दिपावली निमित्त फराळाचे आयोजन केले आहे. सर्वाना दिवाळ फराळाचे आमंत्रण देण्यात आले.