जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील नागरीकांना दिपावलीच्या फराळाला बोलावून शुभेच्छा देताना आमदार रोहीत पवारांनी कार्यकर्त्यापुढे कोरोना काळातील अडचणी, यापुढे होणारा विकास व त्यासाठी केलेले प्रयत्न याचा पाढा वाचून बाजार समितीची झालेली दुर्दशा सांगून अगामी काळात महाविकास आघाडी एकहाती सत्ता घेऊन सर्वसामान्य लोकांना सत्तेवर बसवणार असल्याची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी त्यांचे टाळ्यांचा गजरात स्वागत केले.
ADVERTISEMENT 

आमदार रोहीत पवार यांनी येथील राज लॉन्समध्ये दिपावलीच्या फराळासाठी नागरीकांना आमंत्रित केले होते. यावेळी ते नागरीकांना शुभेच्छा देताना त्यांनी कोरोना काळातही विकासनिधी खेचून आणला तसेच केलेले कामे सांगितले. जामखेड तालुक्याबाबत बोलताना आ. पवार म्हणाले, ४० रस्त्याचे टेंडर पैकी २७ कामे लवकरच सुरू होणार आहे तर इतर १३ कामाचे टेंडर पंधरा दिवसांत होतील यामुळे ग्रामीण भागातील ४८ गावे या रस्त्यांनी जोडले जातील.
विधानसभा निवडणूक काळात तत्वत: मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना सुधारीत करून १४० कोटीची केली असून शहर, वाड्यावस्त्यावर तिसऱ्या मजल्यावर विजेचा वापर न करता पाणी जाईल ही योजना पुढील ३० वर्षे गृहीत धरून केली असून निधी मंजूर केला आहे. ४५ दिवसांच्या कालावधीतील १५ दिवस राहिले असून टेंडर होईल व भुमीपुजनचा मोठा कार्यक्रम होईल. सदर योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील अंतर्गत रस्ते करणार आहे.
ADVERTISEMENT 

पोलीस वसाहतीचे काम प्रगतीपथावर असून बसस्थानक परिसरात कामाला सुरुवात झाली आहे. शरद पवार साहेबांच्या माध्यमातून मतदार संघातून जाणारा नगर सोलापूर महामार्ग, आढळगाव ते जामखेड या रस्त्याचे भुमीपुजन झाले आहे जामखेड ते पाटोदा रस्त्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करून प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने मोठा प्रश्न सोडला आहे.
आ. रोहीत पवार यांनी जाता जाता बाजार समितीची काय अवस्था झाली आहे. अगोदरच्या नेत्यांनी व सत्तेवरील मंडळीनी घोषणा केल्या पण पाच वर्षांत एकही पूर्ण करता आली नाही. तसेच येथील व्यापार सुधारला पाहिजे, बाजारपेठ वाढावी यासाठी प्रयत्नशील असून आपल्या सर्वांच्या विचाराचे सर्वसामान्य लोक तेथे बसवून एकहाती सत्ता काबीज करण्याची घोषणा केली यामुळे कार्यकर्त्यांनी या घोषणेचे जोरदार स्वागत केले.
यावेळी पंचायत समिती सभापती सुर्यकांत मोरे, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, उत्कर्ष मिल्क अॅड प्रॉडक्टचे चेअरमन त्रिंबक कुमटकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश जरे, कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले, विजयसिंह गोलेकर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.