सहा महिन्यात एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा कोरोनाने घेतला बळी

0
278

जामखेड प्रतिनिधी

              जामखेड न्युज – – –
कोरोना महामारीने सहा महिन्यात एकाच कुटुंबातील चार बळी घेतले आहेत वडिलांच्या तेराव्या दिवशी करोनातून बरे होऊन आलेल्या मुलीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले यामुळे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोना महामारीने होत्याचे नव्हते झाले आहे.
     जामखेड महाविद्यालय जामखेड येथिल प्राध्यापक विनोद पाटील यांच्या आई कुसुमबाई पाटील वय ७८ यांचे पाच महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले. प्रा. विनोद पाटील
(वय ५९) यांनाही कोरोना झाला नगर येथे खाजगी कोवीड सेंटरला अ‍ॅडमिट होते चार महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले.
    प्रा. विनोद पाटील यांचे बंधु आनंदराव पाटील सर (वय ६२) यांचे पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले दि. २९ रोजी त्यांचा तेरावा होता याच दिवशी सकाळी त्यांची मुलगी जिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. अर्चना खंदारे (वय ३२)
आनंदराव पाटील यांची मुलगी २९ आॅक्टोबर रोजी सकाळी दात घासत आसताना अचानक चक्कर येऊन पडली दवाखान्यात दाखल करेपर्यंत मृत्यू झाला होता. तिलाही कोरोना झालेला होता यातुन ती बरी झाली होती. पण वडिलांच्या तेराव्या दिवशीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिचा अंत्यविधी वरपगाव ता. केज जि. बीड येथे झाला.
    सहा महिन्यात एकाच घरातील चार व्यक्ती कोरोनाने हिरावून घेतल्याने सोनेगाव ता. जामखेड येथिल पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
                    ADVERTISEMENT                 
           चौकट
सध्या कोरोना सरकारी आकडेवारी एकदम कमी आहे कालतर शुन्य आकडा होता शासकीय आकडा कमी पण खाजगी कोविड सेंटरमध्ये आणखी पेशंट वाढू लागले आहेत. सरकारी आकडेवारी कमी तर खाजगी दररोज दहा ते पंधरा पेशंट निघतात खाजगी कोविड सेंटरला दाखल होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here