१५ व्या वित्त आयोगातुन साकत गणातील दिघोळ माळेवाडी येथे डॉ भगवानराव मुरुमकर यांच्यातर्फे बसण्यासाठी बाकडे

0
239
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
     पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांनी साकत गणात १५ व्या वित्त आयोगातुन तिनशे बाकडे बसवलेले आहेत त्यामुळे साकत गणातील प्रत्येक गावात बाकडे आले गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले आहे. आता खर्डा गणात बाकडे बसवणार असल्याचे मुरूमकर यांनी सांगितले. मोहा, सावरगाव, शिऊर व नाहुली, देवदैठण, धामणगाव, तेलंगशी नंतर आज दिघोळ माळेवाडी येथेही बाकडे बसवलेले आहेत त्यामुळे तेथील लोकांनी समाधान व्यक्त करीत डॉ मुरुमकर यांचा सत्कार केला.
                       ADVERTISEMENT 
आज मा प्रा राम शिंदे यांचे सहकारी माजी पंचायत समिती सभापती तथा विद्यमान सदस्य  डॉ. भगवानदादा मुरुमकर यांच्या १५वित्तआयोगातुन जामखेड तालुक्यातील साकत गणातील दिघोळ माळेवाडी येथे जनतेला बसण्यासाठी ठीक ठिकाणी बाकडे बसवण्यात आले व लवकरच साकत गणा बरोबर खर्डा जि प गटामधे प्रतेक गावात बाकडे बसविण्याचा मा डाॅ भगवान दादा मुरुमकर यांचा मानस आहे, दिघोळ ग्रामस्तांनी  सभापती डाॅ भगवान दादा मुरुमकर यांचे आभार मानले व सत्कार केला.
                                   ADVERTISEMENT
                         
यावेळी माजी सरपंच गहिनाथ गिते, सरपंच नाना गिते, चेअरमन मच्छिंद्र गिते, मा.पं.स.सदस्य मनोज राजगुर, आशोक गिते, मा.पप्पू दादा गिते, राजकुमार गोसावी, भीमा तागड, संदिप गिते, संतोष माने, आकाश गिते,  बाळू दगडे, बळीराम ढवळे, निलेश टेपाळे,  महादेव तागड, सुदाम उमाप,  काशिनाथ दगडे,  नवनाथ गिते तसेच  दिघोळ-माळेवाडी ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here