ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप

0
305
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. अशा विविध मागण्यांसाठी जामखेड येथील एस कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारून जुन्या एस टी बस अगाराजवळ बेमुदत आंदोलन करण्यात आले. या मुळे एन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला होता. याच अनुषंगाने जामखेड एस टी कर्मचाऱ्यांनी देखील या संपात सहभागी होऊन एस टी बस सेवा बंद करून बेमुदत संप पुकारला आहे.
जामखेड येथील जुन्या बस स्थानका जवळ जामखेड अगाराच्या एस टी कर्मचाऱ्यांनी आज दि २८ रोजी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. त्यांनी आपल्या मागण्यात म्हंटले आहे की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, एस टी कर्मचाऱ्यांना २८% महागाई भत्ता लागु करुन फरकासह देण्यात यावा,७, १४, २१ टक्के वरुन ८,१६,२४ टक्के घरभाडे भत्ता देण्यात यावा, वेतनवाडीचा दर २ टक्यावरुन ३ टक्के करण्यात यावे, दिवाळी पुर्वी अग्रीम उचल १२ हजार ५०० रु देण्यात यावे व बोनस म्हणून १५ हजार रुपये देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या.
त्यामुळे ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला
आसल्याने शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे
हाल झाले. यावेळी आंदोलन प्रसंगी सचिन मासाळ,
बाळासाहेब घाडगे, राहुल शेळके, हनुमंत धनवटे,
सावळाराम टकले, रावसाहेब पोकळे, दत्तात्रय जाधव,
शरद राख, बाळासाहेब सानप यांच्या सह अनेक एस टी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये महीला कर्मचारी देखील सहभागी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here