जामखेड न्युज – – – –
शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळांना दिवाळीसाठी 1 ते 21 नोव्हेंबर अशा 20 दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातच 21 नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे 22 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरु होणार आहेत. यासोबतच शाळांना जर नाताळाच्या सुट्ट्या द्यायच्या असतील तर त्यांनी दिवाळीच्या सुट्ट्या कमी करुन नियोजन करावं, असा सूचनाही शिक्षण विभागानं दिल्या आहेत. तसंच राजमाता जिजाऊ जयंतीचं महत्व लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारातील सुट्टी शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने जाहीर करावी, असंही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे.






