जामखेड न्युज – – –
डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह जामखेड जि अहमदनगर येथे सहायक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेसाठी कृती आराखडा नुसार 12 ऑक्टोबर 2021 रोजी मुलांचे शासकीय वसतिगृह आणि मुलांची शासकीय निवासी शाळा, आरोळेनगर, जामखेड येथे भारताचे सरंक्षण दल या बाबत माहिती विषद करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातील अधिक्षक श्री अनिल किसन गर्जे यांनी भारताचे संरक्षण दल या विषयी माहिती विषद केली. सुरुवातीला निवासी शाळेचा मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कांबळे यांनी कार्यक्रम बद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त केले. आभार श्री वैदय सर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास वसतिगृहातील श्री महानुर क. लि व कर्मचारी वृंद व तसेच निवासी शाळेमधील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थितीत होते.






