जामखेड येथिल साहित्यिक आ.य.पवारांची कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

0
228
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज (सुदाम वराट) 
जामखेड येथील राहणारे प्रसिद्ध साहित्यिक
प्रा.आ.य.पवार याची ‘विश्वाचे नवल’ ही विज्ञान कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष  ( वाणिज्य) पदवी अभ्यासक्रमासाठी  यावर्षी पासून
निवडण्यात आली आहे.वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यात नागपूर विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे.
कवि पवारांचे पाच काव्य संग्रह प्रसिद्ध असून पैकी
धूळपेर काव्यसंग्रहातील कविता निवडण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात  कविता समाविष्ट झालेबद्दल परिसरातील नामवंत व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यामधे प्रा.मधुकर राळेभात, प्रा. राजाराम सोनटक्के, डॉ.लक्ष्मीकांत येळवंडे, डॉ . सुधाकर शेलार, डॉ संजय राऊत आदी मान्यवरांनी पवारांचे अभिनंदन केले आहे.
मराठी भाषेतील मान्यवर समीक्षकांनी आ.य.पवारांच्या
निसर्ग व विज्ञान कवितेची वाखाणनी केली असून, गेल्या वर्षी नांदेड विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात त्यांची विज्ञान कविता घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here