जामखेड प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर चोरट्यांचा सुळसुळाट असुन चोऱ्या रोखण्यात जामखेड पोलीसांना अपयश येत आहे. सतत चोऱ्यांच्या घटना घडतात या चोऱ्यांमध्ये घरातील लोकांना जीवघेणी मारहाण होत आहे यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी अवैध धंद्यांविरोधात जी मोहिम उघडली आहे तशीच चोरट्याविरुद्ध उघडून चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.
अज्ञात चोरटय़ांनी पती पत्नीला रॉड व दगडाने मारहाण
करून त्याच्या जवळील एक लाख अकरा हजार रुपयांची
चोरी केली. या प्रकरणी सहा अज्ञात चोरट्यांविरोधात
जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
शहरातील गोडाऊन गल्ली येथील आईस फॅक्ट्री जवळ दि. १३ रोजी पहाटे ही घटना घडली. तालुक्यात पोलीसांची अवैध धंद्यावर कारवाई सुरू आसली तरी चोऱ्यांचे प्रमाण
रोखण्यात अपयश येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून
चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे त्यामुळे शहरात घबराटीचे
वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी गणेश राम जाधव रा. आईस फॅक्टरी हे आपल्या कुटुंबासमवेत झोपले होते. पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास सहा अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या घराच्या लोखंडी गेटचे व किचन शेजारील रुमचे कुलुप तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तसेच पत्नीच्या अंगावरील मनी गंठण, आंगठ्या असे ३२ ग्रॉमचे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोख व मोबाइल असा एकुण एक लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या दरम्यान चोरट्यांनी फिर्यादी गणेश जाधव व त्यांची पत्नी या दोघांना लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून जखमी केले. घटनास्थळी अहमदनगर येथुन डॉग स्कॉड ला पाचारण करण्यात आले होते. जामखेड पोलीस स्टेशनला चोरी प्रकरणी सहा आज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.