आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

0
155

जामखेड प्रतिनिधी

   आदर्श आचारसंहितेचे पालन करून निर्भय वातावरणात लोकशाही मार्गाने मतदान प्रक्रिया पार पाडावी जर कोणी आचारसंहितेचे उल्लंघन करताना आढळला तर जामखेड पोलीस त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करतील असे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
    जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता यातील दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत व आता 39 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सगळीकडे प्रत्यक्ष पाहणी करून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच गावभेट घेऊन गावकारभारी व मतदारांना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
     सध्या जामखेड तालुक्यात 39 ग्रामपंचायतींसाठी 129 बुथ आहेत कडेकोट बंदोबस्तासाठी 100 पोलीस एक एसआरपी तुकडी व काही होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. खर्डा, बांधखडक, तेलंगशी सह आठ गावे संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत या ठिकाणी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच निवडणूक काळात ज्या कोणी भांडण तंटे केले होते व ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत अशा 14 लोकांना तालुका तडीपारीची नोटीस बजावली आहे. उद्या सकाळी 7.30 ते 8.30 पर्यंत मतदानासाठी त्यांना सवलत असेल नंतर ते तडीपार असतील. तालुक्यात जर कोठे काही गडबड झाली तर ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस पोहचतील व गडबड करणार्‍या लोकांवर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व मतदारांनी निर्भय वातावरणात लोकशाही मार्गाने मतदार करावे जर कोणी दबाव टाकत असेल तर पोलीसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here