जामखेड प्रतिनिधी
मंदिरांचा जिर्णोद्धार, शाळांमध्ये एलईडी प्रोजेक्टर, शाळांसाठी होमथेअटर परिसरात मोठय़ा वृक्षारोपण झाडांना संरक्षक जाळी बसवून उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा केल्याने परिसर हरित झाला आहे. तसेच सध्या अनेक ठिकाणी वाडी वस्तीवर रस्ता तयार करून मुरमीकरण करून रस्त्याच्या कडेने हायमॅक्स दिवे बसवल्याने लोकांची चांगली सोय झाली आहे. लोकांनी रमेश आजबे यांना धन्यवाद दिले आहेत.
शहरातील खाडे नगर भागात उघड्यावरील गटाराचे पाणी रस्त्यावर येऊन लोकांना दुर्गंधीचा त्रास होत होता. तेव्हा भुमीगत गटार करून सिमेंट नळ्या टाकुन रस्त्यावर मुरूम टाकला यामुळे परिसरातील लोकांची सोय झाली. तसेच बीड रोड ते ल. ना. होशिंग विद्यालय रस्ता गेल्या चाळीस वर्षांपासून बंद होता त्यामुळे मुलांना एक किलोमीटर वळसा घालून जावे लागत होते. तेव्हा आजबे यांनी हा रस्ता मोकळा केला व रस्त्यावर पेव्हिंग ब्लाॅक टाकले तसेच पुढे जामखेड महाविद्यालय पर्यंत रस्ता तयार केला. यामुळे सुमारे पाच हजार मुलांची सोय झाली. यासाठी सुमारे अडीच तीन लाख रुपये पदरमोड केली.

तसेच ल. ना. होशिंग प्रवेशद्वार ते तहसिल रोडपर्यंत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केले व झाडांना संरक्षक जाळी बसवली व झाडांना उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा केला. यामुळे आता या झाडांनी चांगले बाळसे धरले आहे व आता परिसर हिरवागार झालेला आहे. दत्त काॅलनी परिसरात सिमेंट पाईप टाकून भुमीगत गटार बांधली.
ग्रामीण रुग्णालयात रूग्णांचे व बरोबर येणाऱ्या नातेवाईकांचे पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते हे लक्षात घेऊन रूग्णालय परिसरात कुपनलिका घेऊन त्यावर विद्युत मोटार बसवली रूग्णांची व नातेवाईकांची पिण्याच्या पाण्याची सोय केली. तसेच रूग्णालय परिसर स्वच्छ करून घेतला.

स्वतःच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती समोर जुने बसस्थानक ते नवीन बस स्थानक परिसरात सुमारे शंभर झाडे लावली व संरक्षक जाळी बसवली तसेच कोल्हेवाडी येथे शंभर वडाचे झाडे लावली, शहरासह ग्रामीण भागात सुमारे पंचवीस हजार मास्कचे वाटप केले. शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालय, आरोळे कोविड सेंटर, हमाल पंचायत, रिक्षा युनियन यांना मास्क व सॅनिटायझर वाटप केले. आरोळे कोविड सेंटरला एक महिना पुरेल एवढे आॅक्सिजन सिलेंडर व दहा क्विंटल गहू व दहा क्विंटल तांदूळ दिला.
जांबवाडी जिल्हा परिषद शाळेचे एक एकर परिसर सुमारे तीनशे हैवा टिपर टाकून सपाटीकरण केले जांबवाडी ते मातकुळी या रस्त्यावर दोनशे हैवा टिपर टाकून रस्ता केला जामखेड स्मशानभूमी ते जांबवाडी रस्त्यावर घरात जाण्यासाठी सिमेंट नळी व हैवा टिपर मुरूम टाकुन प्रत्येक घरासाठी रस्ता तयार केला. काटकर वस्ती ते नगर रोड रस्ता स्वखर्चाने केला.

प्रभाग क्रमांक पाच खडकवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नव्हता तेव्हा पदरमोड करून रस्ता तयार केला व मुरमीकरण करत रस्त्यावर लाईटची व्यवस्था केली.