ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) 2021 साठी मार्गदर्शक सूचना

0
222
जामखेड न्युज – – – 
 कोविड-19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीच्या ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी 19 किंवा 20 ऑक्टोबर,2021 रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून). ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जारी केल्या आहेत.
                           ADVERTISEMENT 
1) कोविड-19 च्या संसर्गजन्य परिसिस्थतीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने 04-06-2021 च्या परिपत्रकान्वये तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे 18-08-2021 व 24-09-2021 च्या परिपत्रकान्वये ब्रेक द चेन अंतर्ग्त दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
2) राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कोविड-19 च्या पार्श्वभूमिवर मोठया संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बध घातले आहे. त्यामुळे ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) शक्यतोवर घरात राहूनच साजरी करावी. तथापि, मिरवणूका काढावयाच्या झाल्यास पोलीस प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने एका मिरवणूकीत जास्तीतजास्त पाच ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीतजास्त पाच इसमांना परवानगी अनुज्ञेय राहील. मिरवणूका दरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे.
3) मिरवणूकीत समक्ष अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने ध्वनिप्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
4) मिरवणूकीच्या दरम्यान स्वागतासाठी पेंडॉल बाधावयाचे असल्यास शासनाच्या नियमानुसान संबधित महापालिका, व पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. पेंडालमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या नियमांचे पालन करावे.
5) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24-09-2021 रोजी शासन आदेशातील नियमांचे काटेकोर पालन करुन मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून प्रवचन करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
6) प्रवचनाने कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावे. केबल, टिव्ही, फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी.
7) सबील-पाणपोई-ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) निमित्त मिरवणूकीच्या रस्त्यावर प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील (पाणपोई) लावण्यात येतात. सबील (पाणपोई) बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्याठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. सदर ठिकाणी सिलबंद पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात यावे. पाणपोईच्याठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात यावे.
8) प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही.
9) कोविड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबविण्यात यावे. व या उपक्रमामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.
10) वरील सूचनांव्यतिरिक्त्‍ स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधीक कडक करण्याचे अधिकार संबधित महापालिका/पोलीस/स्थानिक प्रशासनास असतील.
11) कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबधित महापालिका/पोलीस/स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व मिरवणूक सुरु होण्याच्या मधल्या काळात अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचेदेखील अनुपालन करणे आवश्यक राहील यासंदर्भातील परिपत्रक  गृह विभागाचे उपसचिव यांनी निर्गमित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here