इंधन दरवाढीवरुन रोहित पवारांचा भाजपाला टोला!!

0
206
जामखेड न्युज – – – 
         
पेट्रोल-डिझेलच्या दरांत रविवारी सलग चौथ्या दिवशी लिटरमागे ३५ पैशांची वाढ झाली स्वयंचलित पेट्रोल-डिझेल हे हवाई इंधनापेक्षा ३० टक्क्यांनी महाग झाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांत रविवारी सलग चौथ्या दिवशी लिटरमागे ३५ पैशांची वाढ झाल्यामुळे देशभरात हे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. वाढत्या पेट्रोल-डिझेल दरामुंळे विरोधक केंद्र सरकरावर टीका करत आहेत. दरम्यान विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचं इंधन महाग झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर मिश्किल शब्दात टीका केली आहे.
                        ADVERTISEMENT
 
“विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणारं पेट्रोल-डिझेल महाग, अशा बातम्या आज बघायला मिळाल्या. त्यामुळे ‘ब्रेड मिळत नाही तर केक खा’ असं सांगणाऱ्या फ्रान्सच्या राणीची गोष्ट आठवली! आता सामान्य लोकांनी विमानाचा प्रवास करावा’, असं भाजपाच्या लोकांनी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको!” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
‘विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणारं पेट्रोल-डिझेल महाग’ अशा बातम्या आज बघायला मिळाल्या आणि ‘ब्रेड मिळत नाही तर केक खा’ असं सांगणाऱ्या फ्रान्सच्या राणीची गोष्ट आठवली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here