नगर – बीड महामार्गावर आढळून आला अनोळखी मृतदेह

0
500
जामखेड न्युज – – – –
अहमदनगर- बीड महामार्गावर आष्टी जवळील पोखरी गावानजीक रोडच्या कडेला आज सकाळी 40 ते 42 वर्षीय तरुणाचा अनोळखी मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या व्यक्तीची ओळख पटली नसून आष्टी पोलिसांनी मृतदेहाची आष्टी ग्रामीण रुग्णालयात रवानगी केली आहे.ओळख पटवण्यासाठी आष्टी पोलिस प्रयत्न करत आहेत.
आष्टी तालुक्यातील पोखरी गावाच्या पूर्वेस रात्रीच्या वेळी वर्दळ नसते जवळपास ग्रामस्थांचा रहिवस नसल्याने रात्रीच्या वेळी कोणीच तिकडे फिरकत नसते महामार्ग असल्याने रोडवर मोठ्या प्रमाणावर दळणवळण असते आज दि.18 ऑक्टोंबर रोजी सकाळी नागरीकांना
40 ते 42 वर्षीय तरुणाचा मृतदेह बेशुद्ध अवस्थेत पडलेला नागरिकांना दिसला हा प्रकार कळताच नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली.
आष्टी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस हवालदार एस.ए.क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेऊन या व्यक्तीला आष्टी ग्रामीण रुग्णालयात हलवले. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसून त्याची ओळख पटलेली
नाही.
                          ADVERTISEMENT 
सदर प्रेताचे वर्णन अंगावर पांढरा शर्ट,निळी जिन्स पॅन्ट,पायामध्ये काळा केशरी बुट सडपातळ असा बांधा आहे. सदर तरुणाची ओळख पटली नसून वरील वर्णनाचे कुठे ओळख पटल्यास आष्टी पोलीस स्टेशनची
संपर्क साधुन पोलिस निरीक्षक सलीम चाऊस मो.नं. 8806166100
पोलिस उपनिरीक्षक काळे 8600591754
पोलिस हवालदार क्षिरसागर 9850907879 या
 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सलीम चाऊस बीट अमलदार पो.ह.संतोष क्षीरसागर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here