जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज (सुदाम वराट)
ऐतिहासिक खर्डा येथिल शिवपट्टण किल्ल्यावर सर्वात उंच भगवा ध्वज आमदार रोहित पवारांनी उभारला त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होऊन इतिहासाला उजाळा मिळाला आहे. स्वराज्य भगवा ध्वज व खर्डा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. महामार्गावरून जाणारे पर्यटक व मुद्दामच किल्ला व भगवा स्वराज्य ध्वज पाहण्यासाठी दररोजच मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे त्यामुळे हे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे.
ADVERTISEMENT

याबाबत माहिती अशी की खर्डा येथील ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिसरात भारतातील सर्वात उंच स्वराज्य भगवा ध्वज आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून दसऱ्याचे दिवशी हजारो जणसमुदाय यांच्या उपस्थितीत फडकला गेला.
खर्डा येथिल शिवपट्टण किल्ल्याच्या समोरूनच शिर्डी हैदराबाद हा राज्य मार्ग आहे, वाहनांची मोठी वर्दळ येथूनच बार्शी, येरमाळा, तुळजापूर, सोलापूर, गाणगापूर, हैदराबाद, तसेच शनिशिंगणापूर,शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर,पुणे व मुंबई इत्यादी देवस्थानला जवळून जाणारा हात राज्य रस्ता पूर्वीपासूनच आहे त्यामुळे येथून जाणारे दुचाकी व चारचाकी गाड्यांची चाके या बहुचर्चित स्वराज्य ध्वज व किल्ला पाहण्यासाठी वळू लागली आहेत, याठिकाणी पर्यटक मोबाईल वरून फोटोसेशन व सेल्फी फोटो काढून आनंद घेत आहे दररोज किल्ला पाहण्यासाठी 200 ते 300 गाड्या या ठिकाणी थांबत असल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे हा सर्वात उंच भगवा ध्वज पाहताना एक वेगळाच वातावरण मनामध्ये निर्माण होत आहे हे या ठिकाणी आल्यानंतर जाणवत आहे, सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून या स्वराज्य झेंड्याकडे पर्यटक पाहत आहेत नंतर फोटो काढूनच पर्यटक पूढील प्रवास करताना दिसत आहेत हा भगवा झेंडा फडकवून तीन दिवस झाले नाही तोवरच पर्यटकांची आतापासूनच गर्दी होत असल्याने आगामी काळात स्वराज्य ध्वज व मराठ्यांचा शेवटचा विजय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या खर्डा शिवपट्टण किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होऊन खर्डा हे आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र होण्याची शक्यता आगामी काळात झाल्याशिवाय राहणार नाही अशी आशा येथील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.






