वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

0
224
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
आजच्या युगात वाढदिवसावर लोक हजारो रूपये खर्च करतात.पण कोल्हेवाडी येथिल सामाजिक कार्यकर्ते ब्रम्हा कोल्हे यांनी पालकांना समजावून सांगत प्रत्येक मुलाच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे याला खुपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वच स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
      कोल्हेवाडी येथिल सिद्धी सोमनाथ सरोदे, हिंदवी सोमनाथ कोल्हे, राजवीर लक्ष्मण कोल्हे या ती विद्यार्थ्यांचे वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हेवाडी येथिल विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले वही, पेन, पॅड व वेगवेगळ्या गोष्टींच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बाळगोपाळाच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसुन आला. अशाच प्रकारे वाढदिवस साजरे करणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना चव्हाण सर, राम कोल्हे, वाल्मिक कोल्हे, ब्रम्हा कोल्हे, ज्ञानेश्वर कोल्हे, कृष्णा कोल्हे, भगवान कोल्हे, बाळू कोल्हे, बाबू पवार, मुकेश कोल्हे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्रीमंत असो वा गरीब रूबाब मात्र बडेजाव करून वाढदिवसानिमित्त पै पाहुणे, मित्र मंडळी यांना बोलावून हॉल,मंडप, डेकोरेशन अवाढव्य खर्च करणे आदी परंपरा सध्या समाजात जोमात सुरू आहेत. शिवाय वाढती महागाई तरी देखील समाजात अशा प्रवृत्तींना ऊत आला असून सर्व काही असतांना देखील समाजासाठी आपण काही देणं लागत या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत ब्रम्हा कोल्हे यांनी चांगला पायंडा पाडला आहे.
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here