भगतसिंहांचे विचार गावाखेड्यांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी नौजवान भारत सभेकडून पोस्टर प्रदर्शन व बुकस्टॉल

0
166
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
09 ऑक्टोंबर रोजी भगतसिंहांचे विचार गावाखेड्यांमध्ये, विद्यार्थीविद्यार्थिनींपर्यंत घेऊन जाण्याच्या उद्देशाने जामखेड येथे नौजवान भारत सभेकडून पोस्टर प्रदर्शन व बुकस्टॉल लावण्यात आला.
भगतसिंह यांच्या विचारांची ओळख देणारी व वैचारिक पुस्तके बुकस्टॉल वर ठेवण्यात आली होती. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक चळवळीची माहिती देणाऱ्या पोस्टरचे प्रदर्शन लावले गेले.
नौजवान भारत सभा ही भगतसिंहांच्या क्रांतिकारी विचारांवर चालणारी तरुणांची संघटना आहे. अन्यायावर आधारित प्रचलित समाजाला बदलण्यासाठी तरुणांना एकत्र करण्याचे व कामगार- कष्टकऱ्यांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी व समाजातील अन्यायाविरोधात लढण्याचे काम नौजवान भारत सभा देशभरात कार्यरत आहे.
ह्या बुकस्टॉलला आलेल्या तरुणांसोबत देखिल भगतसिंह, व आजच्या काळात देखिल भगतसिंहांच्या विचारांची आज गरज का? ह्यावर चर्चा झाली. ह्या उपक्रमाला जामखेडवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here