विवाहितेच्या छळ प्रकरणी नऊ जणांविरोधात जामखेड पोलीसात गुन्हा दाखल

0
248
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
घर बांधण्यासाठी व पोल्ट्री शेडचा हप्ता फेडण्यासाठी माहेरुन एकूण पाच लाख रुपये घेऊन ये असे बोलून विवाहितेचा गेल्या सात वर्षांपासून छळ केला जात होता. अखेर या छळास कंटाळून विवाहितेने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सासरकडील एकुण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिडीत विवाहित महीला मुळ रा. बेलवंडी स्टेशन. ता श्रीगोंदा (हल्ली रा. हळगाव ता. जामखेड) ही २०१३ रोजी लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी बेलवंडी स्टेशन ता. श्रीगोंदा या ठिकाणी राहत होती. या नंतर तिचा सासरकडील पती सतिश महादु लाढाणे, दीर अनिल महादु लाढाणे, सासरे महादु किसन लाढाणे, सासु हैसाबाई महादु लाढाणे, उषा अनिल लाढाणे, किसन बाळु लाढाणे, व आनखी एक , सर्व.रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा व चांगुणाबाई बबन कापसे, बबन बापु कापसे दोघे रा. हळगाव ता. जामखेड यांनी फिर्याद विवाहितेस सासरी नांदत आसताना म्हणत होते की तुला नांदायचे आसेल तर घर बांधण्यासाठी माहेरुन तीन लाख व पोल्ट्री शेडचा हप्ता फेडण्यासाठी दोन लाख असे एकुण पाच लाख रुपये घेऊन. तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. अखेर पिडीत विवाहित महीलेने या छळास कंटाळून जामखेड पोलीस स्टेशनला दि ७ अॉक्टोबर रोजी दाखल केलेल्या फीर्यादी वरुन सासरकडील एकुण नऊ जणांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक
साठे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here