आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून सुटणार जामखेड मधील पत्रकार भवन व वसाहतीचा प्रश्न

0
205

जामखेड प्रतिनिधी

           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांसाठी चांगले कार्यालय व निवासाची नितांत गरज ओळखून
 पत्रकारांसाठी पत्रकार भवन व पत्रकार वसाहतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल असे आश्वासन आमदार रोहित पवारांनी जामखेड मधिल पत्रकारांना दिले.
       जामखेड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नासीर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, सचिव मिठुलाल नवलाखा, सहसचिव अविनाश बोधले, खजिनदार सुदाम वराट, प्रसिद्धीप्रमुख धनराज पवार, पप्पू सय्यद, जाकीर शेख यांनी जामखेड मधील पत्रकारांसाठी पत्रकार भवन व पत्रकार वसाहत असावी अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार रोहित पवारांकडे करण्यात आली तेव्हा आमदार पवारांनी सकारात्मकता दर्शवत जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्याशी चर्चा केली व पत्रकार भवन व वसाहतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे सांगितले.
     पत्रकार वसाहत व निवासाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून लवकरात लवकर सुटेल यामुळे जामखेड तालुक्यातील पत्रकारांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here