वारसाची नोंद करून फेरफार देण्यासाठी तीन हजाराची लाच मागणाऱ्या लाचखोर तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

0
252
जामखेड न्युज – – – 
 सातबारावर वारसाचा नाद करून त्याचा फेरफार देण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना पिंपळा वाघळूज , पिंपळगावच्या तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे . एसीबीच्या डीवायएसपी पदी रूजू झाल्यानंतर भारत राऊत यांच्या नेतृत्वात ही पहिली कारवाई आहे . ही कारवाई सहा ऑक्टोबर रोजी आष्टीच्या तहसिल कार्यालयात करण्यात आली आहे. जालिंदर गोपाळ नरसाळे ( वय 49 सज्जा पिंपळा वाघळूण, पिंपळगाव घाट ह.मु. लक्ष्मी अपार्टमेंट जामखेड नाका , नगर कायमचा पत्ता गोरेगाव ता. पारनेर जि . नगर ) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे . एसीबीने दिलेल्या माहितीनुसार 29 एप्रिल 2021 रोजी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती . तक्रारदाराची पत्नी व नातेवाईकांच्या नावे सातबारावर वारस म्हणून नोंद करून फेरफार देण्यासाठी तीन हजार रूपये लाचेची मागणी केली होती . मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्यामुळे त्यांनी यासंदर्भात बीड एसीबीकडे धाव घेतली होती . त्याअनुषंगाने 29 एप्रिल 2021 रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक नरसाळे यांनी लाच मागितल्याचे सिध्द झाले . त्यानुसार त्या लाचखोर तलाठ्याला पकडण्यासाठी सहा ऑक्टोबर रोजी आष्टी तहसिल कार्यालयात एसीबीने सापळा लावला. याठिकाणी तीन हजाराची लाच घेताना एसीबीने सदर तलाठ्याला रंगेहाथ पकडले, त्यानंतर त्याच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ. राहूल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, डीवायएसपी भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी, डॉ. सुनिता मिसाळ , पोलिस अंमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, हनुमान गोरे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी हे करत आहेत .
शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here