जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
महिलांनी घराबाहेर पडताना स्वतःच्या दागिन्यांचा सांभाळ करावा गळ्यातील दागिने सहजासहजी दिसणार नाहीत असे झाकून ठेवावेत विनानंबर मोटारकारस्वार व तोंड बांधलेले मोटारसायकलवर स्वार यांच्यापासून शक्यतो सावध राहावे असे आवाहन जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.
जामखेड न्युजशी बोलताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की, सध्या सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना महिलांनी काळजी घ्यावी. सोनसाखळी चोरांपासून सावध राहावे सध्या कोरोना काळ असल्याने गरबा व इतर सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात महिला मोठय़ा प्रमाणावर घराबाहेर पडतात या काळात सोनसाखळी चोरांचा उपद्रव जाणवतो तेव्हा आपले गळ्यातील दागिने शक्यतो झाकून ठेवावेत सहजासहजी दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी विना नंबर व तोंड बांधलेल्या मोटारसायकल स्वारांपासून सावध राहावे. निर्जन स्थळी मागेपुढे फिरणारे मोटारसायकल स्वारांपासून सावध राहावे किंवा काही अक्षेपार्ह वाटल्यास ताबडतोब पोलीसांना फोन करा
असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले