जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
जामखेड नगरपरिषदेच्या वतीने शासनाच्या ऊर्जा संवर्धन धोरणातंर्गत शहरातील जुने पारंपरिक ऊर्जाखाऊ दिवे बदलून त्याजागी २ हजार ३७० एलईडी पथदिवे बसवले जाणार असून पहिल्या टप्प्यात १ हजार २०० पथदिवे लावले जाणार आहे. यामुळे नगरपरिषदेच्या लाखो रुपयांची विजेच्या बिलाची बचत होणार असून दिवाळीपूर्वी शहर उजळून निघणार आहे.
जामखेड शहरातील सर्व भागात जुने पारंपरिक जास्त ऊर्जाखाऊ पथदिवे बसविण्यात आले होते. शहरात असलेले जुने पथदिवे सतत बंद राहत असल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. साहित्य खरेदी, देखभाल दुरुस्ती व मासिक वीज देयक खर्च मोठा होता या खर्चाची आता बचत होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.
जामखेड नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र शासन उर्जा संवर्धन धोरण दि. २२ जून २०१७ व नगरविकास विभागाच्या दि. १२ जानेवारी २०१८ आणि दि. ०४ जून २०१८ शासननिर्णयान्वये EESL (केंद्रशासन पुरस्कृत कंपनी) मार्पज जुने पारंपारिक उर्जाखाऊ पथदिवे बदलून त्या जागी कार्यक्षम LED पथदिवे बसविणे बाबत करारनामा केलेला आहे. सदरील कामास आज रोजीपासुन सुरुवात होत आहे. जामखेड शहरात उभ्या असलेल्या पोलबर एकूण २३७० LED पथदिवे काम प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात साधारण १२०० LED कार्यक्षम पथदिवे नगरपरिषद अंतर्गत बसविले जाणार आहेत. सदरील कामामुळे शहरातील सार्वजनिक दिवाबतीस अधिक बळकटी मिळणार आहे. असे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.










